मराठी भाषेला मिळाला 'Abhijat Bhasha' दर्जा: महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय"अभिजात भाषा म्हणजे काय?

 

मराठी भाषेला मिळाला 'Abhijat Bhasha' दर्जा: महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय"अभिजात भाषा म्हणजे काय?

What is meant by abhijat bhasha:मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत सतत सभागृहात प्रश्न उपस्थित होत होते. केंद्राकडून अनेक वेळा उत्तर येत राहिले की, विचार चालू आहे. अखेर 3 ऑगस्ट 2023 ला राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आले की, सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

Abhijat bhasha mhnje kay?


मराठी भाषेचा गौरव

ज्ञानेश्वर माऊलींनी गौरव केलेली मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारने केली होती, परंतु आता निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा ग्रंथांचा उल्लेख मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

 नक्की वाचा: दिवाळी 2024: पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे ५ सोपे उपाय [Eco-Friendly Diwali Celebration Tips]


अभिजात भाषा म्हणजे काय?

अभिजात भाषा म्हणजे ती भाषा जी प्राचीन आहे, साहित्यिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे. भाषा दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, तिचं प्राचीन आणि आधुनिक रूप कायम असावं, आणि ती भाषा इतर भाषांपासून घेतलेली नसावी. मराठी भाषेने हे सर्व निकष पूर्ण केले आहेत, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

मराठीचा प्राचीन प्रवास

प्राचीन महारटी, मरहट्टी, महाराष्ट्री, प्राकृत, अपभ्रंश आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे. नाणेघाटातील 2200 वर्षांपूर्वीचा शिलालेख हा सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी या पुराव्यांचा वापर करण्यात आला आहे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होईल?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर दरवर्षी दोन मराठी अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पुरस्कार दिले जातील. तसेच, मराठी भाषेचं सखोल अध्ययन होण्यासाठी केंद्रे उभारली जातील, ज्यामुळे संशोधन आणि अध्यापनाच्या रोजगाराच्या संधी वाढतील. केंद्र सरकारकडून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी अनुदान मिळेल.

नक्की वाचा:Shardiya Navratri 2024: नवरात्रीचे व्रत करण्याची आणि देवीची ओटी भरण्याची ही आहे योग्य पद्धत, दुर्लक्ष करू नका

रोजगार आणि शिक्षणाच्या संधी

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी अनेक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मराठी पुस्तकं, ग्रंथनिर्मिती, अनुवादाच्या संधी या क्षेत्रात मोठा विस्तार होईल. मराठी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, आणि मराठी माणसाचा अभिमान अधिक उंचावेल.

मराठी भाषेच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण पावलं

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड दूर होईल, मराठी शाळांचा दर्जा सुधारेल आणि विद्यार्थ्यांना अधिक रोजगाराच्या संधी मिळतील. मराठी भाषेतील वाचन संस्कृती वाढीस लागेल, आणि मराठीच्या 52 बोलीभाषांवर संशोधन होईल.

अभिजात भाषा म्हणून मराठीचं महत्त्व

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तिचं महत्त्व वाढणार आहे. जगभरातील भाषिक आणि सांस्कृतिक मंचांवर मराठीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे मराठी साहित्य, चित्रपट, आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रात मोठा बदल होईल.

आश्वासने आणि पुढील पावलं

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद आहे. पण, मुलांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणं, मराठी शाळांचा दर्जा वाढवणं, आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आपल्यासमोरचे महत्त्वाचे टप्पे आहेत.

आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद!

Post a Comment

0 Comments